ओशो रजनीश बुद्ध आणि श्रीमंती श्रीधर तिळवे नाईक
बुद्धाविषयीची मांडणी करताना ओशो रजनीश नेहमीच अशी मांडणी करतात की हे लोक राजपुत्र होते म्हणूनच मोक्ष मिळवण्याच्या मागे लागले किंवा त्यांना मोक्ष मिळाला म्हणजेच माणूस जितका श्रीमंत असतो तितका तो आध्यात्मिक होण्याचा धार्मिक होण्याचा चान्स जास्त असतो
साहजिकच मग आचार्य रजनीश ओशो श्रीमंतीची भलावण करत राहतात
आता प्रत्यक्षात काय घडले? दंतकथा अशी आहे की गौतम बुद्धाला तो जोपर्यंत श्रीमंतीत होता तोपर्यंत काही मोक्ष सुचलेला दिसत नाही तो जेव्हा राजवाड्याबाहेर आला तेव्हा त्याला दारिद्र्य दिसले खरे आयुष्य दिसले त्याच्या आधी तो उलट कित्येक काळ आपल्या आयुष्यावर खुशच होता जेव्हा तो राजवाड्याबाहेर आला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आनंदाचा आत्ता पत्ता नाही शांतीचा आता पत्ता नाही तेव्हा मग त्याने सुखाचा त्याग केला अर्थात ही दंतकथा आहे प्रत्यक्षामध्ये काय झाले हे अजूनही स्पष्ट झालेले नाही माझे वैयक्तिक स्वतःचे मत असे आहे की बौद्ध धर्मातले जे वर्ण जात प्रथाक पुरोहित होते त्यांना काही करून राजे लोक आपल्याकडे यावेत असे वाटत होते आणि म्हणूनच त्यांनी अत्यंत जाणीवपूर्वक गौतम बुद्धाची प्रतिमा क्षत्रिय अशी तयार केली जेणेकरून राजेलोक सरंजामदार वर्ग गौतम बुद्धाच्या मागे यावा या योजनेमध्ये नक्कीच यशाची शक्यता होती आणि हे यश मिळालेले दिसते याउलट जे बौद्ध धर्म स्वीकारणारे लोग होते ज्यांना आपल्या राज्यात आपल्या विरोधात उठाव होऊ नये क्रांती होऊ नये असे वाटत होते अशा लोकांना बौद्ध धर्म हवा होता कारण तो कळत नकळत शांतीचा संदेश देत होता या लोकांना क्रांती नव्हे तर शांती हवी होती अगदी ब्रिटिश लोकांना सुद्धा आपल्या साम्राज्यामध्ये शैव लोकांची क्रांती नको होती त्यांना शांती हवी होती म्हणून त्यांनी अहिंसेचा प्रचार करणाऱ्या दोन्ही धर्मांना प्रचंड पाठिंबा दिला ही एक नैसर्गिक साम्राज्यवादी मनस्थिती आहे जी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी करते आणि त्यासाठी धर्म वापरते साहजिकच स्वतःच्या सुरक्षिततेसाठी म्हणून क्षत्रिय लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आता यातील विशेषत: जे राजे होते आणि ज्यांना गौतम बुद्धाचे अपील होते त्यांनी गौतम बुद्ध हा सुद्धा क्षत्रिय होता असे सांगितले कारण गुरु क्षत्रिय होता असे सांगणे त्यांना प्रतिष्ठेच्या पातळीवर गरजेचे वाटत होते कारण त्यामुळे ताळमेळ बसत होता आपल्याच वर्णाचा मानस गुरु करण्याची एक वर्ण मानसिकता सर्वांच्यातच डेव्हलप झालेली होती आपल्याकडे नंतर अनेक पुरोगामी कालखंडामध्ये आपल्याकडचे अनेक क्षत्रिय विचारवंत बुद्धाचा विचार करताना किंवा महावीराचा विचार करताना क्षत्रिय विचारवंत म्हणूनच करतात कारण त्यांच्या दृष्टीने तो त्यांचा त्यामुळे पूर्वज ठरतो . यामुळेच मग मूळच्या आदिवासी असलेल्या कथांच्या मध्ये सुद्धा बदल करून राम कृष्ण यांना राजपुत्र करून टाकण्यात आले याची सुरुवात सुद्धा बौद्ध लोकांनीच केली
ओशो रजनीश यांच्या पुढे सुद्धा जे लोक होते ते प्रामुख्याने श्रीमंत होते आणि त्यांना त्या श्रीमंत लोकांनाच आपला धर्म द्यायचा होता साहजिकच मग त्यांना आपल्या श्रीमंतीचा गिल्ट देणे धर्माच्या वाढीसाठी स्वतःच्या पंथाच्या वाढीसाठी परवडणारे नव्हते म्हणूनच मग एक नवे समीकरण पुन्हा एकदा जन्माला घालण्यात आले ते म्हणजे श्रीमंत असल्यामुळेच तो मोक्षाच्या जास्त जवळ आहे . त्यामुळेच अनेकदा अनेक राजपुत्र संन्यासी कसे झाले याच्या कथा रजनीश्यांनी सुद्धा अधिकाधिक वाढवत नेल्या प्राचीन काळातच वर्ण व्यवस्थेमुळे अशा कथा तयार झाल्या . यातल्या काही खऱ्या होत्या तर काही नंतर रचल्या गेल्या . साहजिकच मग श्रीमंती ही सुद्धा मोक्षाची कॅटेगरी म्हणून अप्रत्यक्षरीत्या वावरायला लागली आणि हे खुद्द रजनीश आणि त्यांचे अनुयायी या दोघांच्या साठी सोयीचे होते. नाते नेहमी बरोबरच्या लोकांच्यात जोडावे ही वर्णव्यवस्थेने हाडामासात रुजवलेली समजूत त्यामुळे अधिकच प्रबळ होत होती . फक्त आता उच्च मध्यमवर्ग मध्यमवर्ग आणि श्रीमंत वर्ग यांची आपापसातली आध्यात्मिक सोयरीक तयार होत होती. कारण नवीन व्यवस्थेमध्ये वर्ण व्यवस्था जाऊन वर्ग व्यवस्था यायला लागली होती .
जे त्या काळामध्ये रजनीश्यांच्या आश्रमात गेले होते त्यांना हे कन्विनससुद्धा करण्याची गरज भासणार नाही. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अनेकांच्या इस्टेटि त्यात रियल इस्टेट सुद्धा येते आध्यात्मिक कारणे देऊन आपल्या मिशन कडे वळवलेल्या दिसतात बॉलीवूड मधल्या कित्येक सिनेनटांच्या फ्लॅटच्या चाव्या त्या काळामध्ये रजनीश यांच्या अनुयायाकडे गेलेल्या दिसतात . जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा मग अनेकांनी रजनीश आश्रम सोडला . विनोद खन्ना सारख्यांना थोडा उशीर झाला विजयानंद सारखे थोडे अगोदर परतले . काहींना गोष्टी पहिल्या भेटीतच कळाल्या .
प्रश्न असा आहे की खरोखर गौतम बुद्ध किंवा भगवान महावीर यांचा यांच्या निर्वाणाचा या सगळ्या आर्थिक स्थितीचा संबंध आहे का ? तर या प्रश्नाचे उत्तर संपूर्णपणे "नाही''असे आहे हे लोक जेव्हा दरिद्री आणि गरीब बनले तेव्हाच यांना मोक्ष मिळालेला आहे अर्थात या गरिबीमुळे सुद्धा मोक्ष मिळालेला नाही त्यांना मोक्ष मिळण्याचे सर्वात मोठे कारण त्यांनी केलेली साधना आहे. अन्यथा लोकांना घरातच मोक्ष मिळाला असता अर्थात घरात बसून सुद्धा साधना करून मोक्ष मिळवता येतो पण त्यात सुद्धा घर महत्वाचे नसते साधना महत्त्वाची असते .
थोडक्यात काय कुठल्याही कार्यजालामध्ये नेटवर्क मध्ये काम करत असताना एक साधी गोष्ट नेहमी सर्वांनी लक्षात ठेवावी ती म्हणजे कार्य केले ते महाजालाशी जोडले तरच यश प्राप्ती होते या बाबतीतल्या खोट्या दंतकथा फारशा काम करत नाहीत .
तेव्हा मोक्ष मिळवायचा असेल निर्वाणप्राप्ती करायची असेल तर साधना करा . तुमच्या आर्थिक स्थितीचा तुमच्या मुक्तीशी तुमच्या मोक्षाशी तुमच्या निर्वानाशी तुमच्या कैवल्यप्राप्तीशी काडीचा सुद्धा संबंध नाही . हे क्रिकेट सारखेच आहे. ज्याला खेळता येते तो स्कोर करतो किंवा विकेटा काढतो . ज्याला येत नाही तो मग कितीही श्रीमंत असो काहीही उपयोग नाही.. तेव्हा उत्तम क्रिकेट खेळायचे तर साधना करावी लागते तसेच मोक्ष मिळवायचा असेल तर साधना करावी लागते .
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment