Sunday, August 9, 2026

हिंदू विरुद्ध वैदिक श्रीधर तिळवे नाईक 


१९६० नंतर जे काही इतिहासात मुख्य द्वि ध्रुवात्मक सिद्धांत आले त्यामध्ये हिंदू विरुद्ध वैदिक हा एक फार महत्त्वाचा सिद्धांत महाराष्ट्रामध्ये उदयाला आला या सिद्धांताचे कर्ते प्र रा देशमुख होते त्यांनी हा सिद्धांत आपल्या सिंधू संस्कृती ऋग्वेद व हिंदू संस्कृती या ग्रंथांमध्ये मांडला होता आमच्या पिढीमध्ये हळूहळू या सिद्धांताबाबत जागृती निर्माण झाली आणि हा सिद्धांत अधिक विस्तारित करता येईल याची जाणीव ही निर्माण झाली. यातूनच मग पार्थ पोळके यांचे हिंदू विरुद्ध वैदिक या नावाचे पुस्तक आले साहजिकच मग याचा विस्तार करणे काही लोकांना आवश्यक वाटायला लागले विशेषत: त्या लोकांना जे साठोत्तरीच्या कायमच प्रभावाखाली होते 


या सिद्धांतानुसार भारतातली संस्कृती जी आहे ती मूळची हिंदू संस्कृती आहे आणि तिला आव्हान देणारी संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय . भारताची वाटचाल ही या दोन संस्कृतींच्या संघर्षाची कथा आहे इतिहास आहे असे हा सिद्धांत मांडतो.


या सिद्धांताचे मूळ जर का आपण शोधत गेलो तर आपणाला थेट महात्मा फुले यांच्यापर्यंत जावे लागते आणि म्हणूनच मग पार्थ पोळके आपले पुस्तक महात्मा फुले यांना का अर्पण करतात ते आपल्याला स्पष्ट होऊ लागते. 


महात्मा फुले यांनी आर्य आणि अनार्य यांच्या मधली सांस्कृतिक द्विध्रुवात्मकता कायमच आपल्या लिखाणामध्ये अंडरलाईन केली आणि त्यातूनच मग ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा संघर्ष पुढे उभा ठाकला . प्रबोधनकार ठाकरे यांनी हा संघर्ष हिंदुत्वाच्या नव्या साच्यामध्ये ओतला त्यांनी निर्माण केलेल्या या साच्याला मी क्षात्र हिंदुत्व असे नाव दिले होते कारण यामध्ये ब्राह्मण संस्कृतीला ठाकरे यांच्या भाषेत महात्मा फुले यांच्या भाषेतील शब्द घ्यायचा तर भटांना पूर्णविरोध करण्यात आलेला होता म्हणजेच हा संघर्ष एका अर्थाने त्यांनी वैदिक संस्कृती विरुद्ध क्षात्र हिंदुत्व अशा स्वरूपात पाहायला सुरुवात केली होती . त्यांचे हे हिंदुत्व एका अर्थाने आधुनिक हिंदुत्व म्हणता येईल. मात्र या हिंदुत्वाला या हिंदुत्वाच्या मांडणीला सिंधू संस्कृतीचे संशोधन लाभले नव्हते आणि म्हणूनच तपशिलांच्या बाबत ती अनेकदा अडखळत चालली होती . पुढे मग सिंधू संस्कृतीचा शोध लागला आणि यासंदर्भातल्या काही गोष्टी अधिक फोडी यायला लागल्या आणि त्यातूनच मग साठोत्तरी पिढीमध्ये हा संघर्ष हिंदू विरुद्ध वैदिक अशा तऱ्हेने पाहिला गेला आणि साठोत्तर पिढीत देशमुख यांनी तो मांडला .


हा जो द्वि ध्रुवात्मकतेचा प्रवाह आहे त्या संदर्भात आमच्या पिढी पुढे फार मोठे प्रश्न निर्माण झाले. आमच्यामध्ये काही लोक असे होते जे साठोत्तरी पिढीची देशीयता अधिक पुढे न्यायला तत्पर होते नितीन वाघ यांच्यासारखे काही अलीकडचे नव बौद्ध लोक सुद्धा या देशीयतेला पुढे घेऊन जाणे गरजेचे मानत होते त्या उलट मी काहीसा असा होतो ज्याला हे सर्व नाकारायचे होते दुर्दैवाने ह्या काळात मी असा एकटाच होतो त्यातूनच मी माझी इतिहासाची मांडणी बदलली आणि द्विध्रुवात्मकता ही जागतिक पातळीवर युरेशियन विरुद्ध नॉन युरेशियन व भारतामध्ये युरेशियन विरुद्ध शैव अशी केली 


अर्थात याला कमी लोक पाठिंबा देत होते परंतु प्रत्यक्ष लोकांचा मात्र याला मिळणारा पाठिंबा हा अधिक प्रमाणात होता . मी शै व श्रुती नेहमीच ओपन ठेवली होती तुम्हाला हिंदुत्वाच्या बाजूने जायचे असेल तर तुम्ही शैव हिंदुत्व स्वीकारा आणि जर का तुम्हाला हिंदुत्वाच्या विरोधात उभे करायचे असेल राहायचे असेल तर मग नॉन हिंदू शैव श्रुती स्वीकारा अशी माझी मांडणी होती आणि आहे मात्र तुमचे मुख्य उद्देश उद्दिष्ट कल्याण वादच असले पाहिजे ती आद्य अट आहे असे मी कायमच सांगत आलेलो आहे.


या काळातले बहुमत मात्र हळूहळू बदलत गेले आणि ते देशीवादी असलेल्या साठोत्तरीच्यामागे सर्वच बाबतीत ठामपणे उभे राहिले सर्व माध्यम यंत्रणा सुद्धा साठोत्तरी पिढीच्या मागे ठामपणे उभे राहिले कारण त्यांना मराठीच्या आणि मराठी माध्यमांच्या अस्तित्वासाठी देशीवाद आवश्यक वाटत होता आमच्या पिढीमध्ये हा संघर्ष संजय सोनवणी यांनी अधिक पुढे नेला आणि वैदिक धर्माला अतिशय कठोर पद्धतीने विरोध केला .


मला स्वतःला साठोत्तरी पिढीच्या कुठल्याच संकल्पना फारश्या मान्य नव्हत्या त्यामुळे ही ही मान्य नव्हती आणि त्याची कारणे मी इतरत्र अनेकदा दिलेली आहेत या मागचे स्पष्ट कारण म्हणजे हिंदू नावाचा धर्म आपणाला दिसत नाही . तसा उल्लेख दिसत नाही उलट शैव संस्कृती शैवधर्म बौद्ध संस्कृती बौद्ध धम्म जैन संस्कृती जैन धर्म वैदिक संस्कृती वैदिक धर्म , ब्राह्मण संस्कृती ब्राह्मणधर्म वैष्णव संस्कृती वैष्णव धर्म असे शब्द मात्र वारंवार दिसतात अगदी ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा आपणाला ब्राह्मणधर्म हाच शब्द 1890 पर्यंत दिसतो 


आता ज्या शब्दाला जवळजवळ १८ व्या शतकातल्या दहाव्या शतकापर्यंत मान्यता सुद्धा नाही असा शब्द का निवडावा असा माझा प्रश्न होता 


दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे आलेले वैदिक हे खरोखर बाहेरून आले होते की बाहेरून येणारे कोणी दुसरेच होते असा माझा प्रश्न होता. 


तिसरी गोष्ट वैदिक धर्म हा जन्मदत्त वर्ण जात व्यवस्था पाळत नाही असे माझे स्पष्ट मत होते आणि वैदिक धर्माने नंतर शैव श्रुती स्वीकारली होती असेही माझे म्हणणे आहे . त्यांनी शैव श्रुतीचा स्वीकार करताना प्रामुख्याने ब्रह्म तंत्र आणि षष्ठीतंत्र ही दोन तंत्र स्वीकारली आणि या तीन गोष्टी मिळून वैदिक धर्म तयार होतो त्यामुळे वैदिक श्रद्धेचा भाग हा कालबाह्य झाला आहे की नाही असा त्या काळामध्ये वाद होता आणि त्यातूनच मग वेदांत नावाचा तिसरा धर्म वैदिक धर्मामध्ये आला. वेदांत धर्माच्या मध्ये वैदिक श्रद्धा आपण स्पष्टपणे नाकारावी वेदांना नाकारावे आणि उपनिषदांना म्हणजेच ब्रह्म तंत्र व सांख्यतंत्र यांना स्वीकारावे असे मानले जात होते . पुढे आद्य शंकराचार्य यांनी या वेदांत धर्माला अतिशय व्यवस्थित आकार दिला त्यामध्ये षष्ठीतंत्र आणि सांख्य धर्म आणि ब्रह्म तंत्र यांचा विचार केला या ब्रह्म तंत्राची सांगड शैव श्रुतीशी घातली यांच्यातल्या काही गोष्टी सुद्धा सामावून घेतल्या आणि एक विशाल आकार तयार केला जर या आकाराला कोणी हिंदू म्हणत असेल तर त्यामध्ये बरेचसे तथ्य आहे कारण या वेदांत धर्मातूनच ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणतो तो निघालेला आहे . 


त्यामुळे नकार देताना आपण वैदिक श्रद्धेला नकार द्यावा पण या वैदिक लोकांनी स्वीकारलेल्या ब्रह्म तंत्र व सांख्यतंत्र व वेदांत तंत्राचा स्वीकार करावा असे मी मानत असल्याने साहजिकच मी वैदिक धर्म स्वीकारला आणि वैदिक श्रद्धा नाकारली . माझ्या मते ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो तो किंवा वैदांत म्हणतो तो दुसरे तिसरे काही नसून शैव धर्माचा वैदिक आकार आहे . पुढे पुढे या लोकांनी यज्ञ संस्था सुद्धा नाकारलेली आहे आणि त्या जागी पूजा स्वीकारलेली आहे असे आपणाला दिसते . त्यामुळे वैदिक धर्म कोणत्या ही अंगाने अलीकडे अशैव राहिलेला नाही .


त्यामुळे साठोत्तरीने जी वैदिक विरुद्ध हिंदू अशी द्विध्रुवात्मकता स्वीकारली तिला मी नकार दिला 


प्रश्न असा आहे की या सगळ्याला वैदिक म्हणून नाव देणे आणि त्याला विरोधी पक्ष मानणे हे कशातून आले या प्रश्नाचे उत्तर आपण पुढच्या लेखात शोधणार आहोत 

श्रीधर तिळवे नाईक 

 देवगन हा शिवगण होता की नाही श्रीधर तिळवे नाईक 


भारतीय इतिहासातील जे काही कळीचे प्रश्न आहे त्यातील एक प्रश्न देवांचे काय हा आहे . आपल्याकडे एक फार मोठा समाज असा आहे की देव हा शब्द संस्कृत आहे प्रत्यक्षामध्ये तो प्राकृत आहे आणि तो आदिवासी लोकांच्या सुद्धा प्रचलित दिसतो आणि मी हे अनेकदा सांगितलेले आहे की आदिवासी लोकांच्या बडा देव या संकल्पनेतूनच पुढे महादेव ही संकल्पना विकसित होत गेलेली आहे . बडा हा शब्द सुद्धा वड या शब्दापासून तयार झालेला आहे वड म्हणजे वडवृक्ष वटवृक्ष आणि त्याचे महत्त्व काय हे मी वटपौर्णिमेवर लिहिलेल्या लेखात आलेले आहे 


एकदा अशी गोष्ट स्पष्ट झाली की मग देवगण हा सुद्धा शंकराच्या काळातला एक गण होता हे आपण सहजरीत्या स्वीकारू शकतो 


प्रत्यक्षामध्ये हा हिमालयाच्या काठी राहत असलेला गण होता आणि त्यामुळेच त्याचा वर्ण गोरा झाला होता कारण बर्फात राहणाऱ्या लोकांचा रंग गोरा होत जातो त्याला पंडित असे म्हणतो आपण तो पंडित वर्ग हा या गणातून प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात उदयाला आला होता अर्थातच इतर गणांच्या मते सुद्धा पंडित होतेच .


महादेव ही संकल्पना प्रामुख्याने देवगणानेच विकसित केली 


मग खरा प्रश्न नेमका येतो कुठे ? यासाठी मुळातच पुन्हा एकदा आपणाला बर्फात जावे लागते जिथे बर्फ असतो तिथे अग्नीची गरज मोठ्या प्रमाणात असते आणि म्हणूनच शंकराची पूजा विधी जेव्हा विकसित होत गेले तेव्हा शंकराची पूजा बर्फाच्या प्रदेशात कशी करायची हाय फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि म्हणूनच या लोकांनी शिवतत्त्वाची पूजा करताना ती प्रामुख्याने अग्नी तत्वाच्या आधारे केली हा आग्नेय म्हणजे दुसरा तिसरा काही नसून सूर्यापासून आलेला आहे अशी ही समजूत होती किंबहुना आग्नेहा मुळातलाच सूर्याचा अंश म्हणून पूजला जातो आणि सूर्यप्रकाश देतो आणि हे जग सूर्याच्या प्रकाशाच्या आधारे चालते हे हळूहळू मानव जातीच्या कधीच लक्षात आलेले होते. प्रश्न एवढाच होता की सूर्याची थेट पूजा करायची की नाही आणि या पूजेला मान्यता होती पण हीच पूजा मुख्य करण्यावरूनच अवेस्तन आणि वैदिक यांच्यामध्ये वाद झालेले आहेत अवेस्तन धर्म हा झरतृष्ट ऋषींनी स्थापन केलेला धर्म मानला जातो अवेस्तन धर्माच्या मध्ये सूर्य हा केंद्रस्थानी आहे त्या उलट वैदिक मात्र असे मानत नव्हते त्यांना या पलीकडे असलेल्या एका शिव तत्वाची जाणीव झालेली होती इसवीसन पूर्व एक 10 हजार वर्षांपूर्वी हे सगळे एकच होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे अवेस्तन धर्माच्या स्थापनेनंतर वैदिक आणि अवेस्तन हे दोन वेगळे धर्म झाले आणि अवेस्तन लोकांनी वैदिक लोकांना हाकलून लावले आणि त्यामुळेच हे लोक भारतात आलेले दिसतात इथे आधीच हिमालयाच्या काठी देवगण अस्तित्वात होता आणि त्यांच्या मधून आधीच ब्रह्म तंत्र आणि षष्ठीतंत्र ज्याला नंतर सांख्य तंत्र म्हटले गेले ते आधीच तयार झाले होते 


बाहेरून आलेल्या आणि नंतर पर्शियन आक्रमणातून सुद्धा इथेच राहिलेल्या काही लोकांना मात्र स्वतःचे वेद फार महत्त्वाचे वाटत राहिले वैदिक विरुद्ध अवेस्तन हा संघर्ष भारतामध्ये नंतर असूर विरुद्ध सूर असा झालेला आहे 


त्यामुळेच अनेकदा जेव्हा काही ब्राह्मण असे म्हणतात की आम्ही इथले तेव्हा समजून चालावा की हे लोक घेतले हिमालयाच्या काठी राहणारे होते आणि ते देवगाणात होते 


शंकराचे या देवघनाशी असलेले संबंध अतिशय चांगले होते कारण त्याची पत्नी पार्वती ही या गणातून आली होती आणि तिला स्वीकारावे की नाही स्वीकारावे यावरून खुद्द शंकराच्या स्वतःच्या गणांच्या मध्ये वाद झालेल्या होता पार्वतीचा स्वीकार सहजासहजी झालेला नाही आणि याचे पुरावे आपणाला अनेक आदिवासी साहित्यातून आणि आदिवासी कथातून दिसतात 


अर्थात एकदा पार्वती ही आपल्या खरोखरच व्यवस्थेला स्वीकारणारी आहे हे लक्षात आल्यानंतर मात्र शंकराच्या नेतृत्वाखालच्या सर्व जणांनी तिला स्वीकारले आणि देवगन सुद्धा शंकराच्याच प्रभावाखाली आला 


भारतावर खरोखरच इराण मधल्या लोकांनी आक्रमण केले की नाही तर याचे स्पष्ट उत्तर नाही असे आहे . मुळात तेवढी या लोकांच्या ताकदच नव्हती.


त्यामुळेच वैदिक धर्म असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण प्रामुख्याने देऊ गणाबद्दल आणि शैवतंत्र स्वीकारलेल्या गणाबद्दल बोलत असतो हे आपण लक्षात घ्यावे मी नेहमीच सांगत आलोय की माझा संघर्ष वैदिक लोकांशी नाही कारण ते आपलेच लोक आहेत जे नंतर ब्राह्मण धर्माच्या टाचेखाली आले आणि त्यांनी ब्राह्मण धर्म स्वीकारला परंतु त्यांच्यापैकी अनेक जण असे आहेत की ज्यांना जेव्हा अक्कल येईल तेव्हा ते आपोआप पुन्हा पंडित होतील वर्ण व्यवस्था पंडित लोकांनी आणलेली नाही ती ब्राह्मण लोकांनी जाणलेले आणलेली आहे आणि भागवत आता अत्यंत जाणीवपूर्वक पंडित हा शब्द वापरतात कारण ब्राह्मण लोकांना हे अपश्रेय त्यांना द्यायचे नाही परंतु त्यांना ही गोष्ट कोणीतरी सांगितली पाहिजे की स्मृति पंडित लोकांनी लिहिलेली नाही ती चक्क ब्राह्मण लोकांनीच लिहिलेली आहे आणि म्हणूनच ब्राह्मण वर्णाचा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये आहे तेव्हा उगाच पंडितांना यामध्ये घसेटू नका .


हे सर्व पंडित ओळखण्याची साधी खूण मी नेहमीच सांगितलेली आहे ती म्हणजे यांचे कुलदैवत हे नेहमी शंकर किंवा शंकराचा अवतार किंवा शंकराची फॅमिली किंवा नंदी असतो .


प्रश्न असा आहे की या देवगाणाचे नेतृत्व कोण करत होते ? शंकराच्या काळामध्ये तरी हे नेतृत्व दक्षाकडे होते आणि यातूनच दक्षक समाज तयार झाला होता दक्षक समाज आणि रक्षक समाज हे शैव समाजातले फार मोठे समाज आहेत .


ब्राह्मणांचे झालेले स्थलांतर हे मात्र सरळ सरळ सामान लोकांचे झालेले स्थलांतर आहे हे लोक युरेशियामधून आलेले होते यांना काही झाले तरी आपला धर्म सोडायचा नव्हता आणि त्यामुळेच ते धर्माच्या बाबतीत कट्टर होते . या लोकांनीच आत्ताचे वेध पूर्वीच्या वेदांशी सांगड घालून तयार केलेली आहेत केलेले आहेत . आणि हे सर्व व्यासांच्या नेतृत्वाखाली घडले म्हणूनच व्यासांना वेद व्यास म्हटले जाते . वेद व्यास ही फक्त व्यक्ती नव्हते ती संस्था होती आणि अनेक व्यास होऊन गेले त्यातूनच व्यासंग हा शब्द आलेला आहे .


वेदांनी कधीही जन्मदिष्टित भूमिका स्वीकारलेली नव्हती ती नंतर आलेल्या ब्राह्मण धर्माने वेदांच्या वड लादली आणि त्याप्रमाणे घाल घुसळ पण केली . 


वेदांच्या मध्ये ब्राह्मण या शब्दाचा उल्लेख जवळ जवळ नाहीत याचे कारण सुद्धा हेच आहे तिथे ऋषी महत्त्वाचे असतात आणि त्यांचे तीन प्रकार होते ज्यांची चर्चा मी आधीच केलेली आहे 


जोपर्यंत आपणही सिम्पल साधी सरळ गोष्ट लक्षात घेत नाही तोपर्यंत वैदिक हा धर्म आपण शत्रु का मानायचा नाही हे लक्षात येणे शक्य नाही .


वेदांच्या नंतर सुद्धा या वेदांचा अंत घडवणारा वेदांत आला आणि हा वेदांत प्रामुख्याने ब्रह्म तंत्र आणि सांख्य तंत्र स्वीकारल्यानंतरच झालेला आहे 


कारण वैदिक ही मुळात श्रद्धा होती धर्म नव्हता तो धर्म तेव्हा झाला जेव्हा त्याने ब्रह्म तंत्र आणि षष्ठीतंत्र स्वीकारले 


ब्राह्मण धर्म ही पूर्णपणे एक वेगळी गोष्ट आहे जिने आपण वैदिक असल्याचा दावा केला परंतु जी प्रत्यक्षात कधीच वैदिक नव्हते हा दावा करणारे लोक प्रामुख्याने मूळचे पंडित होते आणि त्यांना काही झाले तरी आपले शैव-धर्माचे नाते तोडायचे नव्हते देवघनाशी असलेले नाते तोडायचे नव्हते म्हणून हे सर्व घडलेले आहे. परंतु आपण याला बळी पडण्याची काहीही गरज नाही . 


प्रश्न असा आहे की ब्राह्मणांनी हा सगळा धर्म आपला आपल्या ताब्यात घेऊन त्याचे रूपांतर ब्राह्मण धर्मात कसे केले ? आणि आपल्याला सर्वात उच्च ठेवण्यासाठी वर्णव्यवस्था जाती व्यवस्था कशी आणली ? 


त्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात ठेवावी वैदिक धर्म हा फक्त चार वेद आणि दोन तंत्र आणि दोन तंत्रांच्या आधारे निर्माण झालेली उपनिषदे यांच्या पुरताच मर्यादित आहे. 


ब्राह्मणधर्म हा मात्र वेदांच्या नंतर आणि उपनिषदांच्या नंतर आलेल्या ब्राह्मण ग्रंथांच्या पासून आरण्यकांच्या पासून स्मृतींच्या पासून सुरू होतो किंबहुना ब्राह्मण धर्माची खरी प्रस्थान त्रयी 

१ ब्राह्मणग्रंथ हे ऐतरेय ब्राह्मणांच्या पासून सुरू झाले २आरण्यक ग्रंथ

३स्मृति ग्रंथ 


आपले खरे शत्रू ब्राह्मणधर्म पालन करणारे लोक आहेत मग ते ब्राह्मण असो किंवा क्षत्रिय असो .


या बाहेरून आलेल्या ब्राह्मणांनीच हिंदवी असलेल्या पंडित लोकांना बिघडवले . पण मला असे वाटते की पंडित लोकांनी आता शहाणे व्हावे . खुद्द वेदांच्या मध्ये सुद्धा यांचा उल्लेख मग असा आलेला आहे . 


प्रश्न असा आहे की ब्राह्मण धर्म हा ब्राह्मण धर्म आहे का की तो काही जास्त आहे तर तो फक्त धर्म नसून तो संघ आहे आणि हा संघ अतिशय मोठ्या प्रमाणात संघटनात्मक ताकतीच्या आधारे भारतात निर्माण झालेला प्रत्येक धर्म आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचे ब्राह्मणीकरण करतो म्हणजेच ब्राह्मण हा केंद्रस्थानी आणून संपूर्ण सामाजिक व्यवस्था आपल्या पद्धतीने आणि आपल्या स्मृतींच्या पद्धतीने चालवायला पाहतो . यातून कुठलाही धर्म वाचलेला नाही म्हणजे अगदी बौद्ध धर्मामध्ये सुद्धा आपण पाहतो की तिथे सुद्धा मूळ जो उद्देश आहे त्याला शेवटी या लोकांनी हीन करून टाकले . नंतर पाशुपत दर्शनामध्ये सुद्धा लकुलिश या ब्राह्मणाला केंद्रस्थानी आणून नकुलिश या धनगर समाजातून उदयाला आलेल्या आणि पाशुपत दर्शनाची स्थापना करणाऱ्या मुख्य सिद्धालाच हटवले 


नंतर मग बौद्ध धर्मामध्ये हे लोक भोसले आणि यांनी हे लोक भोसले घुसले आणि यांनी तिथे नागार्जुनाच्या सिद्धांताचा फायदा घेत बौद्ध शैव धर्म स्थापन केला आणि त्याला महायान असे नाव देत तो आपल्या ताब्यात घेतला . पुढे मग जेव्हा शैव लोकांनी याला तंत्राच्या साह्याने पुन्हा शह द्यायला सुरुवात केली तेव्हा या लोकांनी तिथेही घुसून वजरायान तयार करून तंत्राला हटवायला सुरुवात केली . त्याला विपरीत बनवले .


नंतर जेव्हा राजा राम मोहन राय यांनी नवीन हिंदू धर्माची सुरुवात केली तेव्हा तिथेही ब्राह्मणी हिंदुत्व स्थापन करून संपूर्ण हिंदुत्व ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली 


प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळी ब्राह्मण संघ किंवा ब्राह्मण धर्म हा कसा काय यशस्वी होतो ? 


या प्रश्नाचे उत्तर मी दुसऱ्या एका लेखात फार पूर्वीच दिलेले आहे .


त्यामुळेच वैदिक हे काही शत्रू नाहीत मुख्य शत्रू म्हणजे ब्राह्मणधर्म आहे मात्र त्याच्या विरोधात लढता येऊ नये अशी व्यवस्था कळत नकळत अगदी समाजवादी आणि कम्युनिस्ट लोकांच्या सुद्धा ब्राह्मण लोक घेत असतात ह्या लोकांनीच वैदिक हा शब्द अधिक प्रचलित केला कारण ब्राह्मण धर्मा विरोधातला लढा यांना नकोच होता .


आता जे लोक कम्युनिझम सुद्धा ताब्यात घेतात ते आज ना उद्या नवयानसुद्धा ताब्यात घेतील याबद्दल शंका बाळगू नये .



श्रीधर तिळवे नाईक 


अवेस्तनअवेस्त


अवेस्तन अवेस्तनअवेस्तनअवेस्तन


अवेस्तन अवेस्तनअवेस्तनअवेस्तन




No comments:

Post a Comment